नवी दिल्ली : देशभरात ९५ विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. काही दिवसांपासून विमान कंपन्यांना मेल आणि मेसेजद्वारे धमक्या येत आहेत. ज्यात २० एअर इंजिया, २० इंडिगो, २० विस्तारा आणि २५ आकाशा विमानांचा समावेश आहे. याशिवाय स्पाइसजेटच्या ५ विमानांना आणि अलायन्स एअरच्या ५ विमानांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत. यामुळे सुरक्षा यंत्रणेत भितीचे वातावरण आहे. याप्रकरणी आता दिल्ली पोलिसांनी ९० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना धमकावल्याप्रकरणी आठ एफआरआय दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या वृत्तानुसार, एका दिवसांमध्ये ९५ विमाने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. जी अत्यंत गंभीर आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हे धमकीचे संदेश X ट्विटर अकाऊंटरही आले होते असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी संबंधित एक्स ट्विटरवर आलेल्या मेसेजच्या खात्याची माहिती मिळवली आहे.
याप्रकरणात एका आठवड्याहून कमी कालावधीत २५० हून अधिक विमानांना बॉम्बने धमक्या देण्यात आल्या. सायबर सेल आणि दिल्ली पोलिसांचे इतर पथक या धमक्यांच्या चौकशी करत असून सोशल मीडियावर लक्ष ठेऊन आहेत. ही बाब गांभीर्याने घेत सरकार विमान कंपन्यांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदे करण्याचा विचार करत आहेत.