बीड : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीच्या तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. दरम्यान, विधानसभेचे तिकीट मिळालेल्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. अशातच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धनजंय मुंडे त्यांची बहिण आणि भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या घरी पोहोचले. यावेळी पंकजा मुंडेंनी त्यांचं औक्षण केलं. महायूतीच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. गुरुवारी दुपारी धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
हे वाचलंत का? - उबाठा गटाची पहिली यादी जाहीर! आदित्य ठाकरेंना वरळीतून पुन्हा संधी
अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "पंकजाताईंसोबत मी माझा अर्ज दाखल केला. त्या उमेदवार असताना मी स्वत: त्यांच्यासोबत गेलो होतो. आज तो क्षण पुन्हा परत आला आहे," असे ते म्हणाले.