मुंबई : आमिर खान याची प्रमुख भूमिका असणारा गजनी चित्रपट २००८ साली प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमावत एक नवा इतिहास रचला होता. आता 'गजनी'च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण लवकरच 'गजनी' चित्रपटाचा सीक्वेल 'गजनी २' येणार असून चित्रिकरण सुरु झाले आहे. विशेष म्हणजे 'गजनी २'मध्ये साऊथमधील सुपरस्टार आमिरसोबत काम करणार आहे.
'गजनी २' चित्रपटात पुन्हा एकदा आमिर खान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच, या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी असणार आहे. कथा वेगळी असणार आहे आणि चित्रपटात साऊथचा सुपरस्टार सुर्या दिसणार असे सांगितले जात आहे. मुळात 'गजनी' हा चित्रपट तमिळ भाषेत आधी तयार केला गेला होता आणि त्यात सुर्या प्रमुख भूमिकेत होता. त्यामुळे आता 'गजनी २'मध्ये आमिर आणि सुर्या आमनेसामने येणार अशी चिन्हे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'गजनी २' हा चित्रपट साऊथ आणि हिंदी भाषेत बनवला जाणार आहे. मात्र, अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आला नाही आहे. तरीही चाहत्यांमध्ये उत्सुकता नक्कीच वाढली आहे. आता 'गजनी २'मध्ये जर आमिर आणि सुर्या एकत्र झळकले तर चाहत्यांना पर्वणी मिळणार यात शंका नाही.