मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उबाठा गटाचा उमेदवार ठरला!

    23-Oct-2024
Total Views |
 
Shinde
 
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींना वेग आला असून आता उबाठा गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात उमेदवार दिला आहे. शिंदेंच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून उबाठा गटाने शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
 
शिवसेनेत फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उबाठा गटाला पाठींबा दिला होता. शिवाय त्यांच्याकडे ठाणे जिल्हाध्यक्ष पदही सोपण्यात आले आहे. कोपरी-पाचपाखडी विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. याठिकाणी उबाठा गटाने केदार दिघे यांना एबी फॉर्म दिला असून लवकरच ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात केदार दिघेंचा निभाव लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.