मराठी कथालेखकांसाठी सुवर्णसंधी! मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर्फे कथा लेखन स्पर्धेचे आयोजन

    23-Oct-2024
Total Views |

मराठी कथा  
 
मुंबई : अभिजात मराठी साहित्यात कथांना विशेष महत्व आहे. मराठी भाषेच्या पुस्तकालयात कथालेखकांना वेगळे स्थान आहे. ही परंपरा कायम राहावी, आणि नवोदित कथालेखकांना व्यासपीठ मिळावे यासाठी मराठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन तर्फे कथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही. कुठल्याही धर्म, पंथ, लिंग, भाषा, व्यक्ती, प्रांताची भावना दुखावणारी कथा या स्पर्धेत ग्राह्य धरली जाणार नाही. कथा १५०० ते २००० शब्दांपेक्षा अधिक विस्तृत नसावी. ही स्पर्धा सर्वांसाठी निशुल्क आहे. प्रथम क्रमांकाला ५००० रुपये आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ३००० रुपये आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला २००० रुपये आणि प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना ५०० रुपये आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असणार आहे. संस्थेचा निर्णय झाल्यास, कुठल्याही मानधनाशिवाय, पारितोषिके विजेत्या किंवा इतर कथा पुस्तकरूपात अथवा ऑनलाईन अथवा दोन्ही पद्धतीने प्रकाशित करण्याचे अधिकार संस्थेकडे राहतील. आपली कथा [email protected] या ईमेल आयडी वर मेल करावी.