हैदराबाद : तेलंगणातील हैदराबाद येथे कट्टरपंथी जमावाने पुन्हा एकदा गोंधळ घातला. सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध नोंदवाला असल्याचे बोलले गेले आहे. तसेच हैदराबाद येथे रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणात सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.
प्रसारमाध्यमाच्या मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी २१ ऑक्टोबर २०२४ रोजी हैदराबाद येथील रेन बाजार भागात मोठ्या संख्येने कट्टरपंथी जमा झाले होते. यावेळी काही कट्टरपंथींनी सर तन से जुदाच्या घोषणाही दिल्या. प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, हा जमाव एका घराबाहेर पोहोचला होता आणि त्यांना धमक्या दिल्या गेल्या होत्या.
दरम्यान घडलेल्या घटनेत याकुतपुरा येथील ब्राह्मणवाडीत कुटुंब राहत असून यावेळी जमावाने गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये पोलिसही मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर असल्याचे पाहायला मिळाले. डोक्यावर नमाजी टोप्या घातलेल्या लोकांची गर्दी दिसत होती.
रात्रभर हा गोंधळ सुरू होता. गर्दी पाहून पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. सकाळी हा गोंधळ संपला. भडकाऊ घोषणा देणाऱ्या तरुणांवर काय कारवाई करण्यात आली, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान पोलीस जमावासमोर मूग गिळून गप्पपणे आपली भूमिका साकरत आहेत.