बांगलादेशात पुन्हा राडा, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या राजीनाम्याची मागणी

    23-Oct-2024
Total Views |

Mohammad Shahabuddin Resign
 
ढाका : बांगलादेशात पुन्हा  एकदा तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी वंग भवनावर चाल केली. ढाकाच्या राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढण्यात आला आहे. आंदोलकांनी आता पाच मागण्या केल्या असून राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री उशीरा घडली होती. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 
मोहम्मद शहाबुद्दीन हे बांगलादेशचे १६ वे राष्ट्रपती आहेत. २०२३ साली राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत अवामी लिग पक्षाने राष्ट्रपतीपदाचा चेहरा म्हणून त्यांचे नाव पुढे केले होते. यामुळे मोहम्मद शहाबुद्दीन यांची बिनविरोध निवड झाली. भेदभाव विरोधी विद्यार्थी आंदोलनाने १९७२ साली लिहिलेले संविधान बदलून नवी घटना लिहिण्याचा आग्रह धरला होता. अवामी लीगच्या संघटनेवर बंदी आणावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
 
 
 
शेख हसीनांच्या नेतृत्वाखाली २०१४, २०१८ आणि २०२४ साली झालेल्या निवडणुका अवैध आहेत. या निवडणुकांमधून निवडून आलेले खासदार तात्काळ अपात्र ठरविण्यात यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
 
दरम्यान, जुलै महिन्यात बांगलादेशात विद्यार्थी चळवळीने संताप निर्माण झाला आहे. सरकारी नोकरीमध्ये असलेल्या राखीव जागा काढून टाकण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर ८ ऑगस्ट रोजी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले.