अमित ठाकरेंभोवती एकनाथ शिंदेंचा चक्रव्यूह!

23 Oct 2024 11:41:38
 
Shinde
 
मुंबई : मंगळवारी मनसे आणि शिवसेनेने आपापली उमेदवार यादी जाहीर केली. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याठिकाणी विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.
 
आमदार सदा सरवणकर हे माहिममधून सलग दोन टर्म विजयी झाले. तर दुसरीकडे, अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंना सदा सरवणकरांचा गड भेदणं शक्य होणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाविकास आघाडीकडून याठिकाणी कुणाला संधी मिळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
 
हे वाचलंत का? -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उबाठा गटाचा उमेदवार ठरला!
 
पंरतू, माहिममध्ये उबाठा गट आपला उमेदवार उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उबाठा गटाने आपला उमेदवार दिल्यास माहिममध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडेल तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0