नवी दिल्ली : तेलंगणातील हैदराबादमध्ये कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. कट्टरपंथी जमावाने सोशल मीडियावर इस्लामविरोधी कथित पोस्टच्या निषेधार्थ जमला होता. जमावाने हैदराबादमध्ये रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करत सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसही मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, ) हैदराबादच्या रेन बाजार भागात मोठ्या संख्येने कट्टरपंथी जमा होत कट्टरपंथीयांनी येथे निदर्शने सुरू केली. एका तरुणाने सोशल मीडियावर इस्लाम धर्माचे प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात अशोभनीय टिप्पणी केली होती, असे कट्टरपंथीयांकडून सांगण्यात आले. यावेळी कट्टरपंथीयांनी 'लब्बैक-लब्बैक' आणि 'सर तन से जुदा'च्या घोषणाही दिल्या.
कट्टरपंथी जमावाने एका घराबाहेर जात कुटुंबाला धमकी दिली. तसेच, हे घर प्रेषित मुहम्मद यांचा अपमान करणाऱ्याचे असल्याचे सांगितले जात आहे. इंस्टाग्रामवरील कथित पोस्टविरोधात कट्टरपंथीयांनी रात्रभर जोरदार गोंधळ घातला. या गोंधळावेळी कट्टरपंथीयांनी 'सर तन से जुदा'चा नारा दिल्याचे बोलले जात आहे.