मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये पक्षप्रवेश सुरु आहेत. अशातच भाजपचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
संदीप नाईक हे माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आहेत. संदीप नाईक हे बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, भाजपने मंदा म्हात्रेंना तिकीट दिल्याने ते नाराज होते. यातच त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केला.