पुणे पोलिसांकडून २१ बांग्लादेशींना अटक! किरीट सोमय्यांची माहिती
22-Oct-2024
Total Views |
पुणे : पुणे पोलिसांकडून २१ बांग्लादेशींना अटक करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांनी दिली आहे. मंगळवार, २२ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दल सांगितले. या बांग्लादेशींकडे बनावट मतदान कार्ड, भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळले असल्याचेही किरीट सोमय्यांनी सांगितले आहे.
Vote Jihad
Pune police arrested 21 Bangladeshis. They have fake Voters Card, Aadhaar card, PEN card.....
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकासह रांजणगाव पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव परिसरात काही बांग्लादेशी नागरिक बेकायदेशीरपणे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, कारेगाव परिसरात शोध घेण्यात आला.
दरम्यान, मौजे कारेगावच्या हद्दीत भाड्याने राहत असलेले १५ पुरुष, ४ महिला आणि २ तृतीयपंथीयांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी केली असता ते बांग्लादेशी नागरिक असून ते बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत असल्याची माहिती पुढे आली.