कोचीमध्ये हे पहिल्यांदा घडलेले नाही, यापूर्वी २०१२ मध्ये अशीच एक घटना घडली होती; जेव्हा अजमल अमीर कसाबला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर कलूर येथील मशिदीत प्रार्थना करण्यात आली होती. एसआयओच्या कोची शाखेने त्यांच्या फेसबुक पेजवर सिनवारला शूर योद्धा म्हणत श्रद्धांजलीपर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असे दिसत आहे की, अनेक तरुण आणि विद्यार्थी श्रद्धांजली सभेत सहभागी झाले आहेत. याप्रकरणी नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. बहुसंख्य प्रतिसाद असे सूचित करतात की केरळ हे दहशतवादाचे केंद्र बनत आहे.
एसआयओने ही श्रद्धांजली सभा कोचीमध्ये कुठे घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, एसआयओने जारी केलेले पोस्टर सूचित करते की अलुवा येथील हीरा कॉम्प्लेक्समध्ये सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या या गोष्टीचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.