देशातल्या सर्वात मोठ्या सिमेंट उत्पादक कंपनीच्या नफ्यात घट

    21-Oct-2024
Total Views |
ultratech-cement-net-profit-decreased


मुंबई :
       अल्ट्राटेक सिमेंटने तिमाही निकाल जाहीर केला असून कंपनीच्या निव्वळ नफ्यात मोठी घट दिसून आली आहे. कंपनीच्या विक्रीत किरकोळ वाढ दिसून आली असून यात ३ टक्के वृध्दी झाली आहे. परिणामी, कंपनीच्या कमाईत घट झाल्याने तिमाही कालावधीत महसूल २.४ टक्क्यांनी घसरत १५,६३४.७३ कोटी रुपये इतका झाला आहे.




दरम्यान, जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा निव्वळ नफा ८२० कोटी रुपये होता. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी कमी आहे. कंपनीच्या कमाईत घट झाली कारण त्याच कालावधीत तिचा महसूल २.४ टक्क्यांनी घसरून १५,६३४.७३ कोटी रुपये इतका झाला.

भारतातील सर्वात मोठी सिमेंट उत्पादक कंपनीने दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात घट नोंदवत कमी महसूल असल्याचे समोर आले आहे. बाजार विश्लेषकांनी वर्तविलेल्या अंदाजांनुसार अंदाजे १५,७११ कोटी रुपये व १,०३२ कोटी रुपये निव्वळ नफ्यांचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु, अल्ट्राटेकने महसुलाच्या बाबतीत अंदाज खरा ठरला असला तरी नफ्याबाबतीत अपेक्षाभंग झाला आहे.