परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा; अंतिम सत्रात दोन्ही निर्देशांकांत घसरण!

    21-Oct-2024
Total Views |
stock-market-lost-initial-gains


मुंबई :   
   आज शेअर बाजार बंद होताना दोन्ही निर्देशांकांत घट दिसून आली आहे. सेन्सेक्समध्ये ७३.४८ अंकांनी तर निफ्टीत ७२.९५ अंकांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ८१,१५१.२७ वर स्थिरावला तर निफ्टी ५० २४,७८१.१० पातळीवर बंद झाला. शेअर बाजार पहिल्या सत्रातील मोठ्या उसळीनंतर घसरणीसह बंद होताना दिसला.




दरम्यान, भारतीय शेअर बाजारात कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून देशांतर्गत बाजारातून सतत पैसे काढून घेण्यात आले. या सर्व व्यवहारांमुळे अंतिम सत्रात मार्केटमध्ये पडझड झाली. विशेष म्हणजे एक्सचेंज डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मागील आठवड्यात शुक्रवारी ५,४८५.७० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.

मागील काही आठवड्यांपासून बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री सुरूच आहे. तसेच, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी १८ ऑक्टोबरला ५,४८५.७० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. तथापि, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५,२१४.८३ कोटींच्या समभागांची खरेदी केली. या व्यवहारांचा नकळत परिणाम बाजारातील निर्देशांकांवर दिसून आला.