आरबीआयच्या भूमिकेमुळे सरकारी रोखे उत्पन्न वाढीची अपेक्षा तर व्याजदर कपातीची शक्यता धूसर!

21 Oct 2024 13:33:10
rbi stands government bonds reporate


मुंबई :     सरकारी रोखे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असून अलीकडील एकूण चलनवाढीचे उच्च आकडे पाहता भविष्यात महागाई उच्च राहण्याची शक्यता आहे, असे विधान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. ते म्हणाले, अलीकडील काळातील चलनवाढीचा डेटा पाहता सद्यस्थितीस रेपो रेटमध्ये कपात करणे धोकादायक ठरू शकते.




दरम्यान, आरबीआयने चलनवाढ आणि भविष्यातील महागाई उच्च राहण्याची शक्यता वर्तवितानाच किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरण आखण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेते. तसेच, सरकारी बाँड यिल्ड ६.८० ते ६.८५ टक्क्यांच्या आसपास असेल. पतधोरण समितीच्या आगामी बैठकीत सुमारे दीड महिन्यातील बाजार हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर, अमेरिकेतील उत्पन्न बदलांवरही आरबीआयकडून लक्ष ठेवले जात आहे.

१० वर्षांकरिता बेंचमार्क सरकारी रोखे उत्पन्न ६.८१ टक्के होते. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात सामान्य मान्सून आणि स्थिर पुरवठा परिस्थिती गृहीत धरून महागाई दर ४.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तथापि, सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आणि प्रतिकूल आधार यामुळे किरकोळ महागाई दर नऊ महिन्यांतील उच्चांक ५.४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.


Powered By Sangraha 9.0