सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांची धर्मा प्रोडक्शनमध्ये ५० टक्के हिस्सेदारी!

21 Oct 2024 14:06:13
poonawala-got-karan-johars-dharma-productions


मुंबई :      लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्या नेतृत्वातील सेरेन एंटरटेनमेंटने धर्मा प्रोडक्शनमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. प्रसिध्द चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि धर्माटिक एंटरटेनमेंटमध्ये अदर पूनावाला यांनी १ हजार कोटी रुपये किमतीचे ५० टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. त्यामुळे ना रिलायन्स, ना सारेगामा तर पूनावाला यांनी ५० टक्के भागीदारी मिळाली आहे.


 

दरम्यान, आम्ही धर्मा प्रोडक्शनची निर्मितीत वाढ करण्यासाठी आणि पुढील काही वर्षांत त्याला आणखी उंचीवर नेण्यासाठी उत्सुक आहोत, असे अदर पूनावाला यांनी सांगितले. या गुंतवणुकीच्या माध्यमातून सेरेन प्रॉडक्शनने धर्मा प्रॉडक्शनमध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा करार केला आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनमधील उर्वरित ५० टक्के हिस्सा सेरेन प्रॉडक्शनचा आहे.

अदर पूनावाला यांच्या गुंतवणुकीचे मूल्य २ हजार कोटी रुपये आहे. आम्ही धर्माची निर्मिती आणि वाढ करण्यास उत्सुक आहोत आणि पुढील काही वर्षांत ते पुढे जास्त उंचीवर नेऊ. या गुंतवणुकीवर टिप्पणी करताना अदर पूनावाला म्हणाले. ही भागीदारी आमच्या भावनिक कथा सांगण्याच्या आणि दूरदर्शी व्यवसाय धोरणे वितरीत करण्याच्या आमच्या क्षमतेचे एक आदर्श संयोजन आहे, असे चित्रपट निर्माते करण जोहर म्हणाले.






Powered By Sangraha 9.0