आरोग्य क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे आयपीओ लवकरच बाजारात येणार!

    21-Oct-2024
Total Views |
niva-bupa-paras-healthcare-ipo-sebi-approves


मुंबई :       आरोग्य क्षेत्राशी संबंधित दोन कंपन्या लवकरच भारतीय भांडवली बाजारात उतरणार आहेत. निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि पारस हेल्थकेअर या दोन कंपन्यांच्या आयपीओला सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी)ने दि. २१ ऑक्टोबर रोजी मंजुरी दिली. विशेष म्हणजे निवा बुपा, पारस हेल्थकेअर सेबीने ३,४०० कोटी रुपयांच्या आयपीओकरिता मान्यता दिली आहे.




दरम्यान, बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड हे आरोग्य विमा क्षेत्रात कार्यरत असून पारस हेल्थकेअर लिमिटेड 'पारस हेल्थ' या ब्रँड अंतर्गत हॉस्पिटल चेन चालविते. आरोग्य विमा कंपनीच्या ताज्या इश्यू आणि ऑफर फॉर सेल(ओएफएस)द्वारे ३,००० कोटी रुपये भांडवल उभारणार आहेत.

कंपनी तब्बल ३,४०० कोटींचा आयपीओ असणार आहे. तर पारस हेल्थकेअर आयपीओ मधून ४०० कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे कंपनीने दि. ०२ जुलै रोजी सेबीकडे आयपीओकरिता अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता अखेर कंपनीला सेबीकडून मान्यता प्राप्ती मिळाली आहे.