ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चांदी लाखाच्या पार; सोनेदेखील ८० हजारांच्या पार जाणार?

    21-Oct-2024
Total Views |
gold-silver-price-today-before-diwali-all-time-high
 

मुंबई :     ऐन दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात दिवसेंदिवस मोठी वाढ दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढती मागणी यामुळे सोने-चांदी दरात वृध्दी होण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ७ हजार रुपये इतका असून २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा ७३,७०० रुपये इतका आहे. येत्या काळात सोन्याचा भाव देखील लाखांचा आकडा पार जाण्याची शक्यता आहे.


हे वाचलंत का? -     ईपीएफओच्या सदस्य संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ; ऑगस्टमध्ये १८.५३ लाख नोंदणी


दरम्यान, सोन्याचा भाव प्रति तोळा ७७,३९० रुपये असून आगामी काळात सोन्याचा भाव वधारण्याची शक्यता आहे. सोन्या-चांदीच्या भविष्यातील भाव आंतरराष्ट्रीय बाजारातही वाढत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज(एमसीएक्स)वर सोन्याचा बेंचमार्क सोन्याच्या फ्युचर्स किमतीने यंदाची सर्वोच्च पातळी ७८,२०१ रुपये गाठली होती.


चांदीच्या वायदा किमतीनेही नवा विक्रम गाठला

चांदीच्या फ्युचर्सच्या दरातही तेजीची सुरुवात झाली होती. एमसीएक्सवर चांदीचा बेंचमार्क डिसेंबर करार १,७८८ रुपयाच्या वाढीसह ९७,१९० रुपयांवर उघडला. लेखनाच्या वेळी, हा करार २,६९८ रुपयांच्या वाढीसह ९८,१०० रुपयांवर व्यवहार करत होता. यावेळी तो दिवसाचा उच्चांक ९८,२२४ रुपये आणि दिवसाचा नीचांक ९७,१९० रुपयांवर पोहोचला. या वर्षी, चांदीच्या फ्युचर्स किमतीने आज ९८,२२४ रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती.