सणासुदीच्या काळात डिजिटल फसवणूक टाळा; 'एनपीसीआय'कडून सतर्कतेचा सल्ला!

    21-Oct-2024
Total Views |
digital payment precautions and guidelines


मुंबई : 
     देशात सणासुदीच्या वातावरणात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी-विक्री सुरू असते. याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ने डिजिटल पेमेंट फसवणुकीपासून वाचण्यासाठी महत्त्वाचे सल्ले जारी केले आहेत. ग्राहकांकडून सणासुदी काळात होणाऱ्या दुर्लक्षामुळे एनपीसीआयने आवाहन केले आहे.




दरम्यान, झकपक ऑफर आणि सूट सवलतींमुळे अनियंत्रित खरेदीला चालना मिळण्यास पोषक वातावरण, विक्रेते आणि अविश्वासार्ह व्यवसायांबद्दल पुरेशी माहिती नसणे, वैयक्तिक माहितीची देवाणघेवाणीमुळे डेटा चोरी होण्याचा धोका या सर्व बाबींचा विचार करता एनपीसीआयकडून प्रत्येक खात्यासाठी मजबूत आणि वेगळा विशिष्ट पासवर्ड तयार करून सुरक्षा वाढविण्याचा सल्ला ग्राहकांना देण्यात येत आहे.

विशेषतः खरेदीसाठी शॉपिंग मॉल्समधील ओपन वाय-फाय नेटवर्कसारख्या असुरक्षित नेटवर्कचा वापर टाळा. त्यामुळे आर्थिक माहिती हॅकर्सना मिळविता येते. आपण नक्की काय ऑर्डर केले आहे याची नोंद ठेवणे ग्राहकांकडून चुकू शकते. त्यातून फिशिंग स्कॅम्सचा धोका संभवतो. बनावट डिलिव्हरी नोटिफिकेशन्स टाळण्यासाठी पेमेंट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा तपासून पाहा अशा स्वरुपाची जागरुकता ग्राहकांमध्ये केली जात आहे.