दिल्लीतील बैठकीनंतर नाना पटोलेंचे विधान, "उद्या काँग्रेसची पहिली यादी येणार.."

21 Oct 2024 17:38:40


Nana Patole
 
( Image Credit : PTI ) 
 
मुंबई : ( Nana Patole ) राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपासंदर्भात रस्सीखेच सुरूच आहे.
 
मुंबई व विदर्भातील अशा एकूण १७ जागांवरुन महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सोमवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोलेंनी जागावाटपासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. 
 
दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले, जवळपास ९६ जागांवर चर्चा झाली असून काही जागा CEC मध्ये टाकणार आहेत व ज्या आघाडीतील जागांवर चर्चा सुरू आहे त्यासंदर्भात येत्या २४ तारखेला पुन्हा चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही जागांवर वाटाघाटी करुन अंतिम निर्णय घेऊन उद्या आम्ही पहिली यादी देऊ, असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0