वारी एनर्जीज आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला; मजबूत आर्थिक स्थिती....; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

21 Oct 2024 15:17:22
brokerage-bullish-on-waaree-energies-ipo 


मुंबई :      वारी एनर्जीज(Waaree Energies Ltd) आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. या आयपीओकरिता १,४२७-१,५०३ रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आली आहे. वारी एनर्जीज लिमिटेड आयपीओकरिता दि. २१ ते २३ ऑक्टोबरपर्यंत अप्लाय करता येणार आहे. अर्जासाठी किमान लॉट आकार ९ शेअर्सचा असून २३ ऑक्टोबर पर्यंत आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. या आयपीओला तज्ज्ञांकडून हिरवा कंदील देण्यात आला असून या माध्यमातून आकर्षक गुंवतणुकीची संधी मिळणार आहे.
 
 
 

दरम्यान, ब्रोकरेज फर्म्स नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या वारी एनर्जीजच्या आयपीओबाबत उत्साही आहेत. देशातील सर्वात मोठ्या सोलर मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून विश्लेषकांनी कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती, सकारात्मक उद्योग परिस्थिती आणि सौर उर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन संधी असे आवाहन गुंतवणूकदारांना केले आहे.

वारी एनर्जीज लिमिटेड आयपीओच्या माध्यमातून ४,३२१.४४ कोटी रुपये उभारणार आहे. २४ ऑक्टोबरला शेअर्सचे अलॉट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कंपनीचे शेअर्स डिमॅट खात्यांमध्ये जमा केले जातील. तर दि. २८ ऑक्टोबरला कंपनी बीएसई आणि एनएसईवर सूचीबध्द केली जाऊ शकते. कंपनी ओडिशामध्ये ६ GW इनगॉट वेफर, सोलर सेल आणि सोलर PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी करेल. पूर्ण मालकीची उपकंपनी संगम सोलर वनमध्ये गुंतवणूक करेल तर उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल.


Powered By Sangraha 9.0