अनुवाद करण्याच्या बहाण्याने शिक्षिकेने केला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अवमान

विद्यार्थ्यांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न

    21-Oct-2024
Total Views |

Narendra Modi
 
गोपालगंजः बिहारच्या एका सरकारी शाळेत एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे इंग्रजी भाषेत अनुवाद करण्यास सांगितल्याची घटना आहे. ज्यात हिंदी वाक्याचा इंग्रजीत अनुवाद करण्यास सांगितला होता. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातले काही वाक्ये अनुवादीत करण्यास सांगितली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत असल्याचा अनुवाद शिक्षिकेने सांगितला होता. सुलताना खातून असे शिक्षिकेचे नाव असून ही घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली होती. ही घटना बिहारच्या गोपालगंज येथील असल्याची माहिती आहे.
 
कट्टरपंथी शिक्षिका सुलताना खातून या काही दिवसांआधी इंग्रजीचा तास घेत होत्या. त्यावेळी शिक्षिका विद्यार्थ्याकडून दिलेल्या वाक्याचा अनुवाद इंग्रजीत करा असे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत आहेत", या वाक्याचे भाषांतर करण्यास सांगितले होते. त्यावेळी घरी गेल्यावर विद्यार्थ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पालकांना दिली होती.
 
याचपार्श्वभूमीवर पालकांनी लेखी तक्रार करत शिक्षणाधिकारी लखिंद्र दास यांच्याकडे दाखल झाले होते. त्यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकाकडे याप्रकरणातील केलेल्या कृत्याचा जाब विचारला गेला. याप्रकरणी शिक्षण विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
 
या प्रकरणी शिक्षणाधिकारी लिखिंद्र दास म्हणाले की, शिकवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशोभनिय टिप्पणी केलेल्या शिक्षिकेला असे वर्तन शोभत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून  याप्रकरणात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. उत्तर आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.