ठाणे आणि कल्याण ग्रामीणसाठी मनसेचे उमेदवार जाहीर!

    21-Oct-2024
Total Views |
 
Raj Thackeray
 
ठाणे : ठाणे आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी मनसेकडून दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
 
मनसेकडून कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "निवडणूकीच्या उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवण्यात येतोय. आज किंवा उद्या आपली दुसरी यादी जाहीर होईल. पण त्याआधी मी इथे आलोच आहे तर, राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो."
 
हे वाचलंत का? -  उबाठा गटाची पहिली यादी स्क्रीनिंगसाठी १० जनपथला! नितेश राणेंची टीका
 
"येत्या २४ तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांच्या निवडणूकीचा फॉर्म भरण्यासाठी मी येणार आहे. त्यावेळी आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उपस्थित राहावं," असे आवाहन राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले आहे.