मंदिराच्या नूतनीकरणासाठी कट्टरपंथींचा विरोध

उत्तर प्रदेशात राणीपूर गावातील घटना

    21-Oct-2024
Total Views |

Uttar Pradesh
 
बिघापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव येथील बिघापूर येथे राणीपूर गावातील मंदिराच्या छताची बांधणी करण्याचे आणि नूतणीकरणाचे काम काही कट्टरपंथींनी थांबवल्याचा मुद्दा आता डोकं वर काढत आहे. याप्रकरणाची माहिती आता सोशल मीडियाच्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करण्यात आली होती.
 
गावात सुमारे १३० घरे मुस्लिम कुटुंबाची असून यात फक्त ३० घरे हिंदू कुटुंबाची आहेत. याचा गैरफायदा घेत कट्टरपंथी या मंदिराच्या नूतणीकरणास विरोध दर्शवला होता. याप्रकरणात कोतवाली परिसरातील राणीपूर गावातील हिरालाल रामनरेश, अनिल कुमार, गीता यांनी सांगितले की, शिव बहादूर विश्वकर्मा यांच्या घरासमोर सुमारे ७० वर्षे जुने शिवमंदिर असून त्यामंदिरात मुंडण, जावळ, विवाह इतर धार्मकि विधी केले जातात.
 
 
 
हिंदू लोकांनी मंदिरात छत टाकून मंदिराच्या नूतणीकरणाच्या बांधकामास सुरूवात केली होती. त्यावेळी निहाल, अनीस, असगर खान, शोएब, सलीम, युनूस, अच्छे आणि रईस या गावातील रहिवासी असलेल्या कट्टरपंथींनी अनेकदा आक्षेप घेतला होता. त्या नजीकच मशीद असून मंदिरात लाऊडस्पीकर लावल्याने त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.
 
याप्रकरणात पोलिसांनी सांगितले की, कोणतेही धार्मिक स्थळ बांधायचे असल्यास प्रशासनाची परवानगी घ्यावी. ग्रामस्थांना मंदिराचे नूतनीकरण करण्यास प्रशासनाची परवानगी घेण्यास सांगितले. प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर मंदिराचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान याप्रकरणाचा संपूर्ण अहवाल आता एसडीएमकडे सूपुर्त करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.