मुंबईकर सरफराजने आणला न्यूझीलंडच्या नाकात दम, मिळालेल्या संधीचं केलं सोनं

    21-Oct-2024
Total Views |

Sarfaraj Khan
 
बंगळूरु : टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दि: २० ऑक्टोबर रोजी बंगळूरु येथे दारूण पराभव झाला. मात्र या कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी केलेल्या खेळीमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यात टीम इंडियाचा नवखा खेळाडू उत्कृष्ठ फलंदाज सरफराज खानने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकूण घेतली आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी सरफराज खानने आंतरराष्ट्रीय शतक झळकवत तिसऱ्या दिवशी ७० धावांहून अधिक धावसंख्या करत एकतर्फी खेळ दाखवला.
 
देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण करून सरफराज खानने चांगल्या धावा केल्या. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर त्याने स्वत:वर काम करणे सुरुच ठेवले. त्याने शतकांमागून शतक ठोकण्याचा विक्रम केला. अखेऱ १५ फेब्रुवारी राजकोट येथे इंग्लंडविरूद्ध पदार्पण करण्याची संधी सरफराजकडे चालून आली होती. त्यावेळी त्याने ६२ धावा केल्यानंतर त्याने शतकाकडे वाटचाल केली होती, मात्र रविंद्र जडेजा आणि सरफराज यांच्यात धाव घेत असताना गोंधळ निर्माण झाल्याने सरफराज बाद झाला.
 
सरफराज खानचे पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच थोडक्यात शतक हुकले होते. मात्र त्यानंतर त्याने शतक पूर्ण केले होते. या शतकाचा आनंद सरफराजच्या गगनात मावणारा नव्हता. त्याने मैदानात धावून शतक पूर्ण केलेला क्षण बेधुंदपणे साजरा केला होता.
 
दरम्यान नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. न्यूझीलंडने भारताच्या भूमीवर देखणी कामगिरी केली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावांत त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी न्यूझीलंड संघाला थांबवणे हे टीम इंडियाच्या अवाक्याबाहेर होते. भारताच्या पहिल्या डावांत प्रत्युत्तर देत असताना पाहुण्या संघाने रचिन रवींद्रने शतक केले आणि टीम साऊदीच्या जोरावर पहिल्या डावांत भारतीय फलंदाज आपल्या मूळ फॉर्ममध्ये आले होते. तिसऱ्या दिवसांत २३१ धावा आणि ३ गडी बाद असा भारताचा धावफलक होता. त्यानंतर टीम इंडियाने एका गडी गमावून ४०८ धावा केल्या होत्या.