विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांचे सावट

पोलिसांच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

    21-Oct-2024
Total Views |
 
Naxalites
 
गडचिरोली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधी नक्षलवाद्यांविरोधात कारवाईची मोठी मागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले आहेत. ही कारवाई गडचिरोली जिल्ह्यातील असून सोमवारी पोलिसांच्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार मारले गेले आहेत. याबाबत एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. याप्रकरणात अधिकाऱ्याने सांगितले की, छत्तीसगड येथील नारायणपूर येथील सीमेला लागून असलेल्या भागात ही चकमक झाल्याची माहिती आहे.
 
याप्रकरणी आता अधिकाऱ्याने सांगितले की, गडचिरोली पोलिसांच्या सी-६० कमांडो टीम आणि सीआरपीएफच्या टीमने ही कारवाई केली आहे. सी-६० कमांडो आणि राखीव पोलीस दल म्हणजेच आरपीएफ यांनी गडचिरोली येथील जंगलात नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली होती असे सांगण्यात आले अशी माहिती देण्यात आली आहे.
 
या कारवाईत नक्षलवाद्यांशी ८ तास चाललेल्या चकमकीत ५ नक्षवलवादी ठार झाले आहेत. त्यापैकी आता यामध्ये ३ महिला नक्षलवादी आणि २ पुरूष नक्षलवादी होते. कमांडो टीम अजूनही संबंधित परिसरात शोध मोहिम राबवत आहे. यामध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.