पोलिसांनी सामूहिक धर्मांतराचा कट उधळला; आक्षेपार्ह साहित्यासह एकाला अटक!

21 Oct 2024 17:34:29

Christian missionaries Conversion News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Christian missionaries Conversion News)
उत्तर प्रदेशच्या मिरिया रेडा गावातील एका घरावर छापा टाकत आझमगड पोलिसांनी सामूहिक धर्मांतराचा कट उधळून लावला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हरिवंश मिश्रा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी (२० ऑक्टोबर) सदर कारवाई केली आहे. याठिकाणाहून पोलिसांनी धार्मिक पुस्तकांसह आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले असून धर्मांतराच्या घटनेमागील आरोपी राजाराम यादव यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिश्रा यांनी केलेल्या तक्रारीत अनेक हिंदूंना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी यादव यांच्यावर हिंदूंना हिंदू देवतांच्या प्रतिमा फाडून त्याजागी ख्रिश्चन चिन्हे लावण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मिरिया रेडा गाव धर्मांतराच्या क्रियाकलापांचे आकर्षण केंद्र बनले होते. या प्रकरणी त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, कंधारपूर आणि महाराजगंजमध्ये उपचार सत्राच्या नावाखाली धर्मांतराच्या प्रयत्नांचा पर्दाफाश काही आठवड्यांपूर्वी या भागात घडला होता. चमत्कारिक उपचारांचे आश्वासन देऊन लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त केल्याबद्दल पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती.

Powered By Sangraha 9.0