अभिराम भडकमकर यांना साहित्य संघाचा नारायण काळे स्मृती पुरस्कार जाहीर

    21-Oct-2024
Total Views |

अभिराम भडकमकर 
 
मुंबई : मराठी साहित्य संघातर्फे दिले जाणारे साहित्य क्षेत्रातील १२ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार ‘अभिराम भडकमकर’ यांना त्यांच्या नाट्यविषयक कर्तृत्वासाठी कै. के. नारायण काळे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचा ८९ वा वर्धापनदिन शनिवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता गिरगावातील साहित्य संघाच्या भालेराव नाट्यगृहात साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अभिराम भडकमकर यांना हा पुरस्कार बहाल केला जाणार आहे.
 
अभिराम भडकमकर यांनी आजवर आलटून पालटून, ज्याचा त्याचा प्रश्न, देहभान पाहुणा, प्रेमपत्र, याच दिवशी याच वेळी, सुखांशी भांडतो आम्ही, स्थळ स्नेहमंदिर, हसत खेळत यांसारख्या अनेक नाटकांचे आणि ॲट एनी कॉस्ट, असा बालगंधर्व, सीता आणि इन्शाअल्लाह यांसारख्या कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक नाटकांचे इतर भाषांमध्ये अनुवाद झाले आहे.