औद्योगिक पार्कसह वेदांता समूह एक लाख कोटींची गुंतवणूक करणार!

20 Oct 2024 18:15:53
vedanta-will-invest

 
मुंबई :    वेदांता लिमिटेड मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असून त्यासंदर्भात कंपनीकडून भाष्य करण्यात आले आहे. वेदांता लिमिटेड राजस्थान येथे तब्बल १ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे. वेदांतने उदयपूर परिसरात एक औद्योगिक पार्क तयार करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील विविध व्यवसायांतील गुंतवणुकीचा समावेश यात असणार आहे. त्याचबरोबर, जस्त, तेल आणि वायूसारख्या क्षेत्रात कंपनी गुंतवणूक करणार आहे.
 
 
हे वाचलंत का? -     तब्बल सहा वर्षांनंतर अमेरिकन कंपनीचे पुन्हा भारतात प्रवेश!
 

दरम्यान, १ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार असल्याचे वेदांताने सांगितले. यामध्ये जस्त, तेल आणि वायूसारख्या क्षेत्रातील गुंतवणुकीचा समावेश असून वेदांत समूहाची कंपनी हिंदुस्तान झिंक तिची जस्त उत्पादन क्षमता वार्षिक १.२ दशलक्ष टन (MTPA) वरून २ एमटीपीए करण्यासाठी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यासोबतच चांदीचे उत्पादन ८०० टनांवरून २,००० टनांपर्यंत वाढवण्यात येणार असून १ एमटीपीए क्षमतेचा खत प्रकल्पही उभारला जाणार आहे.
 
तसेच, वेदांता लिमिटेडची उपकंपनी केयर्न ऑइल अँड गॅस ३५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून उत्पादन क्षमता प्रतिदिन ३ लाख बॅरलपर्यंत वाढविणार आहे. याव्यतिरिक्त, कंपनीचे आणखी एक युनिट सेरेंटिका रिन्यूएबल्स १० हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता विकसित करण्यासाठी ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. ही गुंतवणूक ऊर्जा संक्रमणास मदत करेल व पर्यावरणीय नियमांचे पालन करताना हरित बांधकामाला चालना देईल.





Powered By Sangraha 9.0