भारताच्या विकासपर्वाचा आरंभ, मोदींच्या हस्ते ६१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण

20 Oct 2024 21:27:15
   
modi varanasi
 
लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी वाराणसी दौऱ्यावर असताना, देशभरातील विमानतळ प्रकल्पांसह ६,१०० कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या विकासकामांचे लोकार्पण केले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, आणि बिहार या ५ राज्यांमध्ये ७ नवीन विमानतळे उभारली जाणार असून, देशाच्या विकासाला यामुळे हातभार लागणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी आरजी शंकरा नेत्र रुगणालयाचे उद्घाटन केले. उद्घाटना दरम्यान, मोदी म्हणाले की या रुगणालयामुळे उपेक्षित समुदायांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होईल.

पायाभूत सुविधांच्या विकासात यश
या निमित्ताने पंतप्रधानांनी गेल्या दशकातील एनडीए सरकारच्या कार्याचे कौतुक केले आणि देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासास मदत करणारे शासन असे म्हटले. मोदींनी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी पायाभरणी केली, ज्यामध्ये सुमारे २,८७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह अद्यतन केलेली धावपट्टी आणि नवीन टर्मिनल यांचा समावेश आहे. आग्रा विमानतळ प्रकल्पासाठी सुमारे ९१० कोटी, दरभंगा विमानतळ प्रकल्पासंबंधित ५७० कोटी आणि बागडोगरा विमानळ प्रकल्पासाठी अंदाजे १,५५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. रीवा, अंबिकापूर आणि सहारनपूर येथे नवीन टर्मिनल इमारतींचे कामही सुरू आहे, ज्यामुळे एकत्रितपणे वार्षिक प्रवासी क्षमता २.३ कोटींहून अधिक झाली आहे.

वाराणासीचे उज्वल भविष्य
मोदींनी वाराणसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पुनर्विकासाच्या फेज २ आणि ३ चे उद्घाटन केले, हा प्रकल्प खेलो इंडिया योजना आणि स्मार्ट सिटी मिशनचा भाग असून यात २१० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली गेली आहे. इतर उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर क्रीडा स्टेडियममध्ये १०० खाटांचे वसतिगृह आणि सारनाथमधील पर्यटन सुधारणांचा समावेश आहे, ज्याचा उद्देश बौद्ध वारसा असलेल्या भागात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आहे. यामध्ये पादचाऱ्यांसाठी अनुकूल रस्ते, स्थानिक हस्तकला विक्रेत्यांसाठी नवीन विभाग याचा समावेश आहे. मोदींनी बाणासूर मंदिर आणि गुरुधाम मंदिरातील पर्यटन उपक्रमांसह स्थानिक उद्यानांच्या सुशोभीकरण प्रकल्पांचेही उद्घाटन केले.

पंतप्रधानांनी लोकसभेतील त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, नजीकच्या भविष्यात शहरात होणाऱ्या ऑलिम्पिकसारख्या खेळांच्या तयारीसाठी वाराणसी आता क्रीडाशक्तीचे केंद्र बनणार आहे.

 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0