"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार!"

20 Oct 2024 20:19:33
 
aditi tatkare
 
 
मुंबई : ( Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ) राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडून या योजनेबाबत चुकीच्या अफवा पसरवल्या जात होत्या. अशातच या योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
 
काय म्हटले आहे 'या' पोस्टमध्ये ?
 
अदिती तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे", असे स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या आहेत.
 
सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही विनंती त्यांनी केली आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0