महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : भाजपची ९९ उमेदवारांची यादी जाहीर; वाचा कुणाला मिळालं तिकीट?

20 Oct 2024 16:07:04
maharashtra assembly election bjp candidates


मुंबई :   
 राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत दि. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे.


maharashtra assembly election bjp candidates


दरम्यान, आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या जागांसाठी लगबग सुरू झाली. वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षांकडून देखील याआधीच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

maharashtra assembly election bjp candidates


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुध्द मविआ असा सामना रंगणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करण्यासाठी दोन्हींकडून बैठका-भेटीगाठी घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, राज्यात अवघ्या महिनाभराचा कालावधी उरला असताना पक्षांकडून उमेदवारांची निश्चिती केली जात आहे.

Powered By Sangraha 9.0