ईपीएफओच्या सदस्य संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ; ऑगस्टमध्ये १८.५३ लाख नोंदणी

20 Oct 2024 19:42:24
epfo memebers counts hiked


मुंबई : 
   कर्मचारी भविष्य निधी संघटना(ईपीएफओ)मध्ये निव्वळ सदस्य संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये १८.५३ लाख सदस्य ईपीएफओशी जोडले गेले असून यंदा ९.०७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या वाढीसह रोजगाराच्या संधींमध्ये वाढ आणि कर्मचारी लाभांविषयी जागरूकता वृध्दीचे द्योतक आहे.
 

हे वाचलंत का? -   औद्योगिक पार्कसह वेदांता समूह एक लाख कोटींची गुंतवणूक करणार!


दरम्यान, कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या निव्वळ सदस्य संख्येत ऑगस्ट मध्ये १८ लाखांहून अधिक सदस्यांची भर पडली असून ईपीएफओने जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत यंदा ०.४८ टक्क्यानी वाढ झाली आहे.

या आकडेवारीत १८-२५ वयोगटातील कामगारांचे प्रमाण अधिक असून एकूण नव्या सदस्यांपैकी ५९.२६ टक्के आहे. तसेच, महिन्याभरातील निव्वळ महिला सदस्यांची संख्या ३.७९ लाख इतकी होती. ऑगस्ट २०२३ च्या तुलनेत १०.४१ टक्के वाढ दिसून आली आहे. महिन्याभरात समाविष्ट नवीन सदस्यांपैकी सुमारे २.५३ लाख महिला सदस्य आहेत.


Powered By Sangraha 9.0