तब्बल सहा वर्षांनंतर अमेरिकन कंपनीचे पुन्हा भारतात प्रवेश!

    20-Oct-2024
Total Views |
american-company-bissell-again-entered


मुंबई :     अमेरिकन कंपनी बिसेल होम सोल्युशन्यसने पुन्हा एकदा भारतीय बाजारात एंट्री घेतली आहे. तब्बल सहा वर्षांनंतर व्हॅक्युम क्लिनर्सच्या क्षेत्रात कार्यरत असणारी बिसेल कंपनी पुन्हा नव्याने बाजारपेठेत दाखल झाली आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या बिसेलने भारत हा भविष्यात एक अतिशय महत्त्वाची बाजारपेठ असेल, अशी आशा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर कंपनी परत एकदा भारतीय बाजारात प्रवेश केला आहे.


हे वाचलंत का? -     विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर; फडणवीसांसह अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात!


दरम्यान, भारत जागतिक स्तरावर फ्लोअर केअर उत्पादनांसाठी तुलनेने लहान बाजारपेठ आहे, परंतु तिची लोकसंख्या आणि वाढती अर्थव्यवस्था पाहता ही गुंतवणूक भविष्यासाठी आहे, असे अध्यक्ष मॅक्स बिसेल यांनी सांगितले. ते म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की भविष्यात भारत ही एक अतिशय महत्त्वाची बाजारपेठ असेल. आपण फक्त लोकसंख्या आणि आपल्या समोर असलेल्या संधी पाहिल्यास ही भविष्यातील गुंतवणूक आहे, असेही ते म्हणाले.

बिसेल(Bissell)ने भारतात वितरणासाठी 'Cavitec Global Commerce' सोबत भागीदारी केली आहे. 'SpotClean HydroSteam' आणि 'SpotClean ProHeat' यांसारख्या तात्पुरत्या ओल्या आणि कोरड्या व्हॅक्यूम क्लीनिंग सिस्टम्स सादर करण्यावर लक्ष केंद्रित करेल. जे ई-कॉमर्सवर आधीपासूनच उपलब्ध असून ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत.