गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; IPO प्रमाणे फंड ब्लॉक करण्यासाठी युपीआय सुविधा!

    02-Oct-2024
Total Views |
there-will-be-investment-in-shares-and-like-easy-ipo


मुंबई :       आता कंपनीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुलभ होणार आहे. आयपीओ(IPO)प्रमाणेच खात्यातील निधी ब्लॉक करण्यासाठी युपीआय सुविधा मिळणार आहे. ०१ फेब्रुवारीपासून पात्र स्टॉक ब्रोकर्स(क्यूएसबी) क्लायंटना त्यांच्या शेअर्स खरेदी-विक्रीसाठी युनिफाईड पेमेंट इंटरफेस(युपीआय) आधारित ब्लॉक यंत्रणा वापरण्याची परवानगी द्यावी लागेल किंवा ट्रेडिंग खात्यात सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. हे पाऊल गुंतवणूकदारांची स्थिती आणखी सक्षम करेल.




दरम्यान, क्यूएसबीने सध्याच्या ट्रेडिंग पद्धतीव्यतिरिक्त या दोन पर्यायांपैकी एक ऑफर करणे आवश्यक आहे. बचत खाते, डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते हे व्यवसाय खात्यातील तीन सुविधांअंतर्गत एकत्र केले जातात. या प्रकरणात ग्राहकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात असतील आणि शिल्लकीवर व्याज मिळणार आहे. त्याचबरोबर, ट्रेडिंग सदस्यांना निधी हस्तांतरित करून विद्यमान ट्रेडिंग सुविधा सुरू ठेवण्यासह नवीन सुविधेची निवड करण्याचा पर्याय असणार आहे.

युपीआय पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ होत असून या उपक्रमामुळे गुंतवणूकदारांना अधिक चांगली पारदर्शकता, व्याजाची कमाई आणि पेमेंट सुलभतेसह मजबूत सुरक्षितता आणि फायदा होईल, एनटीटी डेटा पेमेंट सर्व्हिसेस इंडियाचे मुख्य वित्तीय अधिकारी राहुल जैन म्हणाले. याव्यतिरिक्त, या निर्णयामुळे निधी व्यवस्थापन सुधारेल आणि गुंतवणूकदारांच्या सोयी वाढतील, असेही त्यांनी सांगितले. हे त्यांना व्यवसायांना खात्यात निधी ‘ब्लॉक’ करून त्यांच्या निधीच्या गैरवापरापासून संरक्षण देऊन पेमेंट करण्याची परवानगी देईल.