मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (mulim in garba pandals) नुकत्याच येऊ घातलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या भोपाळमधील एका हिंदू संघटनेने गरबा आयोजकांकडे विशेष मागणी केली आहे. जे लोक भगवान विष्णूचे तिसरे अवतार 'वराह'ची पूजा करतील, त्यांनाच प्रवेश द्यावा जेणेकरून इतर समुदायाच्या सदस्यांना दूर ठेवता येईल. असे हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
भोपाळमधील 'संस्कृती बचाओ मंच'चे प्रमुख चंद्रशेखर तिवारी म्हणाले की, गरबा आयोजकांनी आपल्या पंडालच्या प्रवेशद्वारावर वराहाचे चित्र लावावे. त्याची जो पूजा करेल त्या व्यक्तीलाच पंडालमध्ये प्रवेश द्यावा. या अटींमुळे वराह अवताराला अपवित्र मानणाऱ्या इतर समाजातील सदस्यांना प्रवेश रोखता येईल. यापूर्वी इंदूर जिल्हा भाजप अध्यक्ष चिंटू वर्मा यांनी गरबा आयोजकांनी फक्त 'गोमूत्र' पिणाऱ्यांनाच प्रवेश द्यावा, अशी सूचना केली होती.