रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडून वाडीबंदर डेपोची पाहणी

02 Oct 2024 11:50:05
 
ashwini vaishnav
 
 
मुंबई, दि. १ : केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी मंगळवार, दि. १ ऑक्टोबर रोजी वाडीबंदर कोचिंग डेपो, मुंबई येथे पाहणी करत सर्वसमावेशक तपासणी केली. यावेळी त्यांनी डेपोच्या पायाभूत सुविधा, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील विस्तार योजनांचा आढावा घेतला. तर तपासणीत प्रवाशांची सुरक्षा, स्वच्छता आणि सेवेची विश्वासार्हता वाढवण्यावर भर देण्यात आला.
 
ट्रेन सेफ्टी-मेंटेनन्सवर भर
 
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी ‘लिंक हॉफमन बुश’ (एलएचबी) कोचमध्ये केलेल्या सुधारणांची पाहणी केली. ज्यामध्ये स्प्रिंग फेल्युअर्स कमी करण्यासाठी, राईड आराम आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी ‘टीपीयू’ रिंग जोडणे समाविष्ट आहे.
 
सुरक्षितता आणि कार्यक्षमतेसाठी प्रगत तंत्रज्ञान
 
तपासणीमध्ये ‘एअर ब्रेक’ अखंडता सुनिश्चित करण्यासाठी ‘अल्ट्रासोनिक एअर लिकेज डिटेक्शन सिस्टीम’ आणि वेळेवर देखभाल करण्यासाठी ‘फेल्युअर इंडिकेशन आणि ब्रेक अ‍ॅप्लिकेशन’ (एफआयबीए) सिस्टीमसारखी प्रगत साधनांची पाहणी केली.
 
हे तंत्रज्ञान राजधानी एक्स्प्रेससारख्या गाड्यांवर सुरक्षा वाढवत आहेत. याव्यतिरिक्त, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणासाठी ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’ (व्हीआर)चा वापर आणि ‘रिअल-टाईम वॉटर लेव्हल मॉनिटरिंग सिस्टीम’च्या एकत्रीकरणाबद्दल माहिती घेतली.
 
देखभाल आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित
 
यावेळी वैष्णव यांनी ‘वंदे भारत’च्या स्टोअरचा दौरा केला. याठिकाणी ‘वंदे भारत’ गाड्यांचे आवश्यक भाग साठवले जातात. वेळेवर दुरुस्ती आणि सेवेची विश्वासार्हता सुनिश्चित केली जाते. यावेळी वैष्णव यांनी मूलभूत प्रशिक्षणकेंद्राला भेट दिली. ‘एलएचबी कोच’ प्रशिक्षणासाठी ‘इन-हाऊस मॉडेल्स’चे निरीक्षण केले. सुरक्षा आणि सेवा मानके तपासली.
तांत्रिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विलंब कमी करण्यासाठी, प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी आणि कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ‘हॅण्ड-ऑन’ प्रशिक्षणासाठी ‘व्हीआर’ तंत्रज्ञानाच्या वापराचे त्यांनी कौतुक केले.
 
प्रवाशांच्या आरामात नवकल्पना
 
स्वच्छतापूर्ण वातावरण राखण्यासाठी डेपोच्या ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ प्रदर्शनात ‘इन-हाऊस डिझाईन’ केलेल्या कचरा संकलनासारख्या नवकल्पनांद्वारे केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मध्ये साफसफाईच्या प्रक्रियेत वापरल्या जाणार्‍या ‘डायसन व्हॅक्यूम क्लिनर’सह प्रगत स्वच्छता उपकरणांचे वैष्णव यांनी प्रात्यक्षिक घेतले
 
अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन तयारी
 
डेपोमध्ये अग्निशामक यंत्रणा व्यवस्थापित करण्यासाठी डिझाईन केलेल्या नवीन विकसित अ‍ॅपबद्दलदेखील वैष्णव यांना माहिती देण्यात आली. सर्व अग्निसुरक्षा उपकरणे सुस्थितीत आणि सहज उपलब्ध आहेत का, याची खात्री त्यांनी केली.
 
प्रवासी सेवा आणि तक्रार निवारण:
 
वैष्णव यांनी प्रवाशांच्या तक्रारी हाताळण्यासाठी जबाबदार असलेल्या ‘रेल मदत टीम’शी संवाद साधला. तत्पर आणि प्रभावी तक्रारींचे निराकरण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांबद्दल वैष्णव यांनी समाधान व्यक्त केले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0