श्याम मानव विरोधात फौजदारी गुन्हा दाखल होणार?

02 Oct 2024 13:25:04

Shyam Manav

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Shyam Manav)
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक प्रा. श्याम मानव यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे आयोजित कार्यक्रमात हिंदू साधू, संत व महापुरुषाबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. यादरम्यान त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील करण्यात आली. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने तहसीलदार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.

हे वाचलंत का? : शिमलात अवैध जामा मशीद पाडण्यास हिंदूंची मागणी

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, दि. २९ सप्टेंबर रोजी शेतकरी निवास, कारंजा येथे प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हिंदू धर्मातील देवांची, साधू, संत, महात्मा, सकल मराठा समाजाबद्दल चिथावणीखोर विधान करत अपशब्द वापरले. या वक्तव्यामुळे हिंदू धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असून समाजात तेढ निर्माण होवून वाद उसळण्याची दाट शक्यता आहे.

प्रा. मानव हे नेहमीच हिंदू धर्मातील देवी-देवतांचे अपमान करणारे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे श्याम मानव व व्याख्यानाच्या आयोजकांवर कायदेशीर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा सकल हिंदू समाजातर्फ मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येइल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

Powered By Sangraha 9.0