पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू

02 Oct 2024 11:37:28
 
Helicopter
 
पुणे : पुणे येथील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना बुधवार, २ ऑक्टोबर रोजी घडली आहे. यात दोन पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे याच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
पुण्यातील बावधनहून मुंबईच्या दिशेने हे हेलिकॉप्टर निघाले होते. परंतू, अचानक जंगली भागात हे हेलिकॉप्टर कोसळले आणि यात तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून या दुर्घटनेचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर येत असून ते या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते. मात्र, त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0