स्वच्छ भारत अभियानास १० वर्षे पूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता मोहिमेत घेतला भाग
02-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली : स्वच्छ भारत आभियानाला (Swachha Bharat Abhiyan) महात्मा गांधी जयंतीला म्हणजेच २ ऑक्टोंबर रोजी १० वर्षे पूर्ण झाली आहे. २०१४ सत्तेवर आल्यानंतर पहिल्या गांधी जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत मोहिमेस सुरूवात केली आहे. मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याने पंतप्रधान मोदींनी स्वत: स्वच्छता मोहिमेत भाग घेतला आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींनी दिल्ली येथील एका शाळेत भाग घेतला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी कचरा साफ केला, यासंदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यावेळी साऱ्या देशाला त्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्यास सांगितले आहे.
गांधी जयंती पर आज अपने युवा साथियों के साथ स्वच्छता आभियान का हिस्सा बना। मेरा आप सभी से आग्रह है कि आज आप भी अपने आसपास स्वच्छता से जुड़ी मुहिम का हिस्सा जरूर बनें। आपकी इस पहल से 'स्वच्छ भारत' की भावना और मजबूत होगी। #10YearsOfSwachhBharatpic.twitter.com/MvjhazPAvl
नरेंद्र मोदी म्हणाले की, आज गांधी जयंतीच्या दिवशी माझ्या तरुण मित्रांसोबत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आज तुम्हीही तुमच्या सभोवतालच्या स्वच्छतेशी संबंधित मोहिमेचा भाग व्हा, असे मोदींनी सांगितले आहे.
स्वच्छता मोहिमेत सामील होण्याआधी पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे स्मरण केले. त्यांनी दोन्ही महापुरूशांना आदरांजली वाहिली, पंतप्रथान मोदींनी महात्मा गांधींचे जीवन देशवासियांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले आहे.