नवरात्रौत्सवात दुकानांच्या पाट्यांवर मालकांची नावे बंधनकारक

02 Oct 2024 20:57:43

Ratlam
 
रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाम (Ratlam) महापालिकेने नवरात्रौत्सवात दुकानांवर दुकानदारांची खरी नावे लिहिण्याची सूचना दिली आहे. या निर्णयाचे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी स्वागत केले, मात्र दुसरीकडे काही कट्टरपंथींनी निर्णयास विरोध दर्शवला आहे. त्यांनी या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली आहे.
 
याप्रकरणी राजस्व समितीचे दिलीप गांधी यांनी बुधवारी २ सप्टेंबर २०२४ रोजी सांगितले की, इतर राज्यातील अनेक व्यापारी बांगड्या आणि टिकल्या विक्रीसाठी येतात. या दुकानदारांची उत्सवात कोणतीही गैरसोय होऊ नये. यासाठी दुकानदारांना नवरात्रौत्सवात त्यांचे नाव लिहून व्यवसाय करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
 
यासोबत १२ ऑक्टोंबर रोजी सुरू असणाऱ्या यात्रेत उभारण्यात येणाऱ्या दुकांनांमध्ये आधारकार्डचा वापर करण्यात यावा. कोणत्याही दलालास दुकान देऊ नये, महापालिकेच्या या निर्णयाविरोधात कट्टरपंथी पक्ष आता एकवटला आहे.
 
नावाचा फलक लावण्याच्या आदेशामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आल्यास त्यात महापालिका जबाबदार असेल अशी धमकी कट्टरपंथींनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0