बरेली : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने मोहम्मद अलीम नावाच्या तरूणाला जन्मठेपेची शिक्षा दिली. लव्ह जिहाद या प्रकरणाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर एका लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुलाच्या गुन्ह्यात साथीदार असलेले आलिमचे वडील साबीर यांनाही २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश परिस्थिती निर्माण करण्याचा कट रचला जाण्याची भीती न्यायालयाने आपल्या टिप्पणीत व्यक्त केली. ही घटना २० सप्टेंबर २०२४ रोजी घडली आहे.
प्रासारमाध्यनाने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांच्या कोर्टात झाली. जवळपास दीड वर्षे चाललेल्या या खटल्यात तक्रारदार आणि बचाव पक्ष या दोघांनीही आपापले युक्तीवाद मांडले. मात्र बचावकार्याने मांडलेला युक्तीवाद हा समाधानकारक न वाटल्याने आरोपी आलिम आणि त्याचे वडील साबीर यांना शिक्षा सुनावली. आलिमला जन्मठेपेची तर साबीरला २ वर्षाची शिक्ष सुनावण्यात आली. आलिमला एक लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
लव्ह जिहादमुळे हिंदू मुलींचे धर्मांतरण वाढत असल्याने हे एक षडयंत्र असल्याचे बोलले गेले आहे. बेकायदेशीर धर्मांतरण हे देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचे सांगून न्यायमूर्ती दिवाकर यांनी त्यात विदेशी निधीची भीतीही व्यक्त केली आहे, या कायद्याला भारतात आळा घातला नाहीतर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम दिसू शकतात, असेही न्यायालयाने मान्य केले आहे.
दरम्यान, आलिमने आपण आनंद आहे अशी हिंदू युलतीला ओळख सांगितली. त्यानंतर त्याने तिच्याशी मैत्री केली. मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झाले. त्यानंतर आलिमने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर पीडित युवती गर्भवती झाली. त्यानंतर पीडितेने आलिमसोबत विवाह करण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र आलिमने पोटात असलेल्या बाळाचा गर्भपात करण्यास पीडितेवर दबाव आणला.