Ind-Ban T20 सामन्यापूर्वी सकल हिंदू समाज आक्रमक!

02 Oct 2024 16:49:26

Hindu Against Bangladesh Team

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hindu Against Bangladesh Team) 
भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना रविवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर सकल हिंदू समाज बांगलादेश संघाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारामुळे संतप्त झालेल्या हिंदू संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. हातात 'बांगलादेश टीम गो बॅक'चे घोषणा फलक घेऊन तीव्र संपात यावेळी आंदोलकांकडून व्यक्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार या सामन्याची तयारीसुद्धा अंतिम टप्प्यात आली आहे. हॉटेलपासून क्रिकेट स्टेडियमपर्यंत दोन्ही संघ एकाच मार्गाने जातील. याआधी वेगवेगळ्या मार्गाने संघांना स्टेडियमपर्यंत नेण्याची योजना होती, मात्र नंतर तो मार्ग बदलण्यात आला. २ ऑक्टोबर रोजी संघ ग्वाल्हेरला येतील आणि ३ ऑक्टोबरपासून सराव सुरू होईल. दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळपासून स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे चार हजार सैनिक सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

Powered By Sangraha 9.0