महाराष्ट्रातील सगळ्या ताई गप्प का? चित्रा वाघ यांच्या मविआतील महिला नेत्यांना सवाल

02 Oct 2024 17:55:55

Chitra Wagh 
 
मुंबई : चंद्रपूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीतील महिला नेत्यांना सवाल केला आहे. या घटनेतील आरोपी हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असून यावर मविआतील कुठल्याही नेत्याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
 
 
 
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील एका नामांकित शाळेत ११ वर्षीय विद्यार्थीनीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी शाळेत क्लासेसकरिता गेली असता आरोपी शिक्षकाने तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुख्य म्हणजे आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे.
 
हे वाचलंत का? -  गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा मिळणार!
 
यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "बारामतीची मोठ्ठी ताई, सोलापूरची ताई, मराठी माणूस सोडून खासदारकी घेणार्‍या काँग्रेसमधून उबाठात आलेली ताई, देवी-देवतांना शिव्या देऊन हिंदूत्त्व सांगणारी ताई, अमरावतीच्या राजकमल चौकात हिंदूंचा अपमान करणारी ताई आणि मुंबईतलीही काँग्रेसची एक ताई आज महाराष्ट्रातील या सगळ्या ताई गप्प का?" असा सवाल त्यांनी केला.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या एका निर्लज्ज शिक्षकाने चंद्रपुरात निर्लज्ज कृत्य केले आणि तुम्ही सार्‍या गप्प आहात. तुमच्या तोंडून साधा निषेध निघू नये का? महिला-मुलींवरील बलात्कारही तुमच्यासाठी राजकीय विषय आहे का? या प्रकरणावर बोला आणि महाराष्ट्राला तुमची खरी रुपं कळू द्या," असेही त्या म्हणाल्या.
 
 
 
Powered By Sangraha 9.0