अभंग, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय गायनाचा ‘स्वरानुभूती’ कार्यक्रम

    19-Oct-2024
Total Views |

swaranubhuti 
 
पुणे : सवाई गंधर्व निर्मित अभंग, नाट्यसंगीत आणि उपशास्त्रीय गायनाचा ‘स्वरानुभूती’ हा विशेष कार्यक्रम मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सादर होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिका आरती अंकलीकर-टिकेकर आणि गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहेत. वादक आदित्य आपटे, विभव खांडोळकर, अभिनय खंदे, गणेश पापळ त्यांना सांगीतिक साथ देणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमात निवेदन करणार आहेत. या कार्यक्रमाचइ तिकिटे bookmyshow वर उपलब्ध आहेत आणि २४ ऑक्टोबर पासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुद्धा तिकिटे उपलब्ध होणार आहेत.