संस्कार भारती तर्फे 'रांगोळी प्रशिक्षण शिबिर' आयोजित

    19-Oct-2024
Total Views |

rangoli 
 
ठाणे : संस्कार भारती, कल्याण डोंबिवली महानगर तर्फे दीपावली निमित्त खास लोकाग्रहास्तव ‘रांगोळी प्रशिक्षण शिबिर' आयोजित करण्यात आले आहे. रविवार २० ऑक्टोबर रोजी डोंबिवली पूर्व येथे असलेल्या पेंडसेनगर मधील कानविंदे व्यायामशाळेच्या पहिल्या मजल्यावर हे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क ३०० रुपये आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी सोबत रांगोळी साठी भांडे, फडके, पुठ्ठा, जेवणाचा डबा आणि पाणी घेऊन यावे असे आव्हान आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.