6 जी मोबाईल : भविष्यातील क्रांती

    19-Oct-2024
Total Views |
mobile network revolution


इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरूवातीपासून गेल्या 40 वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन होय. याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना हॅन्डसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे. आता सेलफोन हवा असण्याच्या गरजेचे रूपांतर वेडामध्ये म्हणजे, ‘ऍडिक्शन’मध्ये झाले आहे. इतके की रोटी-कपडा-मकानसारख्या जीवनावश्यक गोष्टींमध्येच, लोक आता कळत-नकळत सेलफोनचाही समावेश करू लागले आहेत. गेल्या दहा वर्षांत मोबाइल फोनच्या हॅन्डसेटचे स्वरूप किती बदलले आहे, हे सांगायला नकोच. हॅन्डसेट लहान आणि हलके बनले आणि मुख्य म्हणजे त्याद्वारे मिळणार्‍या सुविधांमध्ये आश्चर्यकारक वेगाने वाढ झाली. सध्या प्रत्येकाच्याच हाती स्मार्टफोन्स दिसू लागल्याने , हॅन्डसेटवरून ‘लाइव्ह स्ट्रिमिंग व्हिडिओ’ पाहणार्‍यांची संख्या विलक्षण वाढणार आहे. 6जी हे पुढील पिढीचे वायरलेस कम्युनिकेशन तंत्रज्ञान आहे. जे 5जीपेक्षा खूपच वेगवान, अधिक विश्वासार्ह आणि अनेक नविन क्षमतांसह येणार आहे. हे तंत्रज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात क्रांती करेल. ‘6 जी’ म्हणजे नक्की काय ते समजण्यासाठी आपल्याला मोबाईलचा इतिहास समजून घ्यावा लागेल. यातील ‘जी’ म्हणजे जनरेशन. आपण याला आपल्या भाषेत पिढी अथवा जशी पुस्तकाची असते तशी आवृत्ती असे म्हणू.
 


इतिहास:

1जी : सेल्युलर मोबाईल सर्विसेस ही सर्वात आधी-nalogueरेडिओ टेक्नोलॉजी वापरात होते. तीच फर्स्ट जनरेशन सिस्टिम असे मानले जाते. त्यावरून फक्त कॉल करता येत असत.

2जी : त्यानंतर-nalogue, रेडिओ टेक्नोलॉजी नेटवर्कचे डिजीटल नेटवर्कमध्ये रुपांतरित झाले. त्यास 2 जी असे संबोधले जाते. 2 जी मध्ये इंटरनेटची सुविधा नव्हती. 2 जीने एसएमएस अर्थात शॉर्ट मेसेजिंग सर्विस या सुविधेचा प्रथम वापर सुरू केला.
3जी : त्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रसार झालेल्या व अधिक चांगल्या सोई जास्त वेग व संपूर्ण सुधारित आवृत्तीस 3 जी म्हणता येईल. इंटरनेट मोबाईलवर आले ते 3जी मुळेच.

4जी : स्मार्टफोनच्या आगमनानंतर लोक डेटा मोठ्या प्रमाणावर वापरायला लागले आणि त्यामुळे अधिक जलद इंटरनेटची गरज भासू लागली. त्यातून 4जी नेटवर्कचा जन्म झाला. मोबाईल नेटवर्कच्या या चौथ्या आवृत्तीतील मुख्य सुधारणा म्हणजे, अधिक जलद इंटरनेट सुविधा.

5जी : 5जी तंत्रामुळे आपण फ़क्त स्मार्टफोन नव्हे, तर सर्व उपकरणे जोडू शकू. 5जी मोबाईल नेटवर्कमध्ये खूप जास्त बॅन्डविड्थ उपलब्ध होईल, आणि त्यामुळे मोबाईल इंटरनेट अतिशय जलद असल्याचा अनुभव येईल. ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या संकल्पनेमुळे, आता जवळजवळ प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण इंटरनेटला जोडले जात आहे. स्मार्टफोनप्रमाणेच, इतरही अनेक वस्तू आणि उपकरणे हुषार झाली आहेत व ती इंटरनेट, ब्ल्युटूथ, निअर फ्रिक्वेन्सी(एनएफ) इ. मार्गांनी परस्परांशी संवाद साधू शकतात. वापरकर्त्याने आपल्या विशिष्ट गरजा एकदा स्मार्ट उपकरणांना सांगितल्या की, ती उपकरणे एकमेकांशी ‘बोलून’ स्वतःच निर्णय घेऊ शकतात.

6जी : 6जीची गती 5जीपेक्षा अनेक पटीने अधिक असणार आहे. 6जी हे एक अत्यंत वेगवान, अविश्वसनीय आणि अत्यंत सुरक्षित वायरलेस कम्युनिकेशन स्टँडर्ड आहे. हे आपल्याला उच्च-गुणवत्तेची व्हिडिओ कॉलिंग, आभासी वास्तविकता, ऑगमेंटेड रियलिटी आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज सारख्या अनेक तंत्राचा व्यावहारिक अनुभव देईल. 6जी टेराहर्ट्ज तरंगांचा वापर करून, अधिक डेटा प्रवाह करण्यास सक्षम असेल. नेटवर्क स्लाइसिंगमुळे नेटवर्कला वेगवेगळ्या अनुप्रयोगांसाठी ऑप्टिमाइझ केले जाऊ शकते. 6जी तंत्रज्ञान खूपच जटिल आहे आणि त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकास आवश्यक आहे. नोकिया, एरिक्सन, हुआवेई आणि सॅमसंग हँडसेट उत्पादक व सेवादेयक आहेत. जे 6जी वर चालतील अशा मूलभूत अत्यावश्यक प्रणाली विकसित करण्यात अग्रेसर आहेत.

6जी तंत्रज्ञान 5जी सारख्या विद्यमान तंत्रज्ञानावर तयार होत आहे. परंतु, नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर कार्य करेल आणि लक्षणीय वेगवान गती, अधिक कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. 6जी उद्योग आणि तंत्रज्ञान इकोसिस्टम खरोखरच जागतिक आहे. सध्याचे प्रमुख 6जी संशोधन प्रकल्प जपान, अमेरिका, चीन ,दक्षिण कोरिया, जर्मनी, फिनलॅन्ड आणि विस्तीर्ण युरोपियन युनियन मध्ये होत आहेत. आता त्यात नवीन नाव ते म्हणजे आपला भारत देश. हे सर्व प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच मोबाईल काँग्रेस मध्ये मोठी घोषणा केली. दूरसंचार विभागाने भारत 6जी व्हिजन तयार करण्यासाठी 6जी (TIG-6G) वर तंत्रज्ञान अभिनव गट स्थापन केला आहे. 2030 सालापर्यंत, भारतात 6जी तंत्रज्ञान विकसित करण्याचे धोरण आहे. या व्हिजनचे उद्दिष्ट: 6जी नेटवर्क तंत्रज्ञान तयार करणे आणि वापरात आणण हा होय. जे सुरक्षित, बुद्धिमान आणि व्यापक कनेक्टिव्हिटी प्रदान करेल व नागरिकांना चांगले जीवन जगण्यास सक्षम करेल.

इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU), टेलिकॉम मानकांच्या विकासावर देखरेख करणारी आणि जगभरातील स्पेक्ट्रम आणि सॅटेलाइट ऑर्बिट रिसोर्सेसचे व्यवस्थापन करणारी, संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे, व या संस्थेने 6जी व्हिजन फ्रेमवर्क स्वीकारले आहे.

6जी प्रकल्पाचे टप्पे: 6जी प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्याचा प्रस्ताव आहे:

पहिला टप्पा (2023 ते 2025): पहिल्या टप्प्यात, अन्वेषणात्मक कल्पना, तंत्रविकास आणि संकल्पनेचा पुरावा चाचण्यांना समर्थन प्रदान केले जाईल.

दुसरा टप्पा (2025 ते 2030): जागतिक समविचारी गटाद्वारे स्वीकृतीसाठी वचन आणि क्षमता दर्शविणार्‍या कल्पना आणि संकल्पनांना 6जी प्रकल्पाच्या व्यावसायिकीकरणाकडे नेणारे, अंमलबजावणीत्मक THz आणि टेस्टबेड तयार करण्यासाठी पुरेसे समर्थन केले जाईल.

6जी साठी पायाभूत सुविधांमध्ये भरीव गुंतवणूक आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ढकू वेव्ह प्रसारित करणे आणि प्राप्त करणे अधिक कठीण आहे, म्हणून 6जी नेटवर्कला नवीन अँटेना डिझाइन आणि सिग्नल प्रक्रिया तंत्र वापरण्याची आवश्यकता असेल. सहाव्या पिढीचे (6जी) वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञान उच्च कव्हरेज, कमी ऊर्जेचा वापर, सर्वसमावेशक स्पेक्ट्रल आणि सुधारित सुरक्षिततेसह किफायतशीरपणा प्रदान करेल असा विश्वास आहे.

विस्तारित वास्तविकता आणि मिश्रित वास्तविकता मोबाइलच्या सहाव्या पिढीचा भाग असेल. 100GHz च्या आसपास फ्रिक्वेन्सीवर 6जी ऑपरेट करते - हे संवेदनांचे इंटरनेट आहे. भौतिक आणि आभासी जगाचे संमिश्रण हे 6जी चे वैशिष्ट्य आहे. पुढील दशकात स्मार्ट उपकरणे, आय.ओ.टी (इंटरनेट ऑफ थिंग्स) या तंत्रामुळे, सर्वत्र इंटरनेट बॅण्डविड्थ लागेल. इथेच 6जी कामाला येईल. यामुळे मोबाईल कॉल्स वेगळे असतील. आत्ता आपण द्विमिती व्हिडिओ जमान्यात आहोत. 6जी मुळे जीवन आकाराचे 3डी होलोग्राम प्रदर्शन शक्य होते. ज्यांच्याशी आपण संपर्क साधत आहात, त्या व्यक्ती रिअल टाइममध्ये (जशा आहेत तशा प्रोफाइल चित्र नव्हे) आपल्या जवळ प्रगट होतात. अनेक पौराणिक टीव्ही सिरिअल्स मध्ये देवदेवता मानवाच्यासमोर प्रगट झालेले दाखवत असत, 6जी होलोग्राम तंत्रामुळे हेच तंत्र सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. यामुळे दळणवळण क्षेत्रात क्रांती होईल . 2026 सालच्या मध्यास हे प्रायोगिक तत्त्वावर सुरु होईल व 2030 सालापर्यंत सर्वत्र उपल्बध होईल. पारंपरिक द्विमिती मोबाईल फोन चा अस्त त्यामुळे नक्कीच होईल.

डॉ. दीपक शिकारपूर