निर्मात्याची गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला थेट चित्रपटाची ऑफर; गृहमंत्रालयालाही केली विनंती

    19-Oct-2024
Total Views |
salman khan  
 
मुंबई : अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याची सुरक्षा अधिक वाढवण्यात देखील आली आहे. एकीकडे सलमान-बिश्नोई वाद सुरु असताना आता अभिनेता आणि निर्माता कमाल खान याने सलमानशी पंगा घेतला आहे.
 
सलमान खानला आलेल्या या धमकी प्रकरणात एकामागून एक अनेक घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. तसेच, केंद्रीय यंत्रणा या प्रकरणात अटकेत असणाऱ्या आरोपींची चौकशी करत आहेत. इतकंच नव्हे तर सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडने लॉरेन्स बिश्नोईसोबत संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता एका निर्मात्याने सलमान खानचा शत्रू लॉरेन्स बिश्नोईलाच थेट चित्रपटाची ऑफर दिली आहे.
 
 
 
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर कमल आर. खान याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याने आपल्या 'देशद्रोही' चित्रपटाच्या दुसऱ्या भागात बिश्नोईला मुख्य भूमिकेत कास्ट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे की, "मी माझा देशद्रोही २ चित्रपट लॉरेन्स बिश्नोईला ऑफर करतो, कारण तो एक आदर्श हिरोसारखा दिसतो. जेव्हा तो चित्रपटात प्रत्यक्ष ॲक्शन करेल, तेव्हा तो चांगला दिसेल. त्यामुळे मी गृहमंत्रालय कार्यालयालाही विनंती करतो की, त्याला काम करण्याची परवानगी द्यावी."
आता कमाल खानच्या या पोस्टचा परिणामम काय होणार? आणि एकूणच सध्या लॉरेन्स-सलमान वाद कुठपर्यंत जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.