'ह्युंदाई'च्या पेमेंटने इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी कमावले सर्वाधिक कमिशन!

    19-Oct-2024
Total Views |
hyundai ipo investment bankers commission


मुंबई :  
कोरियन कंपनी असलेली ह्युंदाई मोटर इंडियाने आयपीओ बाजारात आणला होता. गुंतवणूकदारांनी आयपीओला उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर नवी माहिती समोर आली आहे. या कंपनीचे शेअर विक्री हाताळणारे गुंतवणूक बँकर यांनी उत्तम परतावा कमविला आहे. ह्युंदाई मोटर कंपनीने आयपीओच्या माध्यमातून २७,८७० कोटी रुपये बाजार भांडवल उभारले आहे.

 


दरम्यान, दक्षिण कोरियन कंपनीने बुक रनिंग लीड मॅनेजर्सना फीज म्हणून तब्बल ४९३ कोटी रुपये दिले आहेत. जे आयपीओच्या इश्यू आकाराच्या १.७७ टक्के इतका आहे. आजवरच्या इतिहासातील आयपीओ हाताळण्यासाठी कंपनीने केलेला आतापर्यंतचे सर्वाधिक मोठा पेमेंट ठरले आहे.

याआधी पेटीएमची मूळ कंपनी 'One97 Communications'ने नोव्हेंबर २०२१ मध्ये १८,३०० कोटी रुपयांचा आयपीओ हाताळण्यासाठी गुंतवणूक बँकर्सना फी म्हणून ३२४ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम कंपनीच्या एकूण इश्यू आकाराच्या १.७७ टक्के इतकी होती. चालू आर्थिक वर्षात कंपनीने शेअर विक्री व्यवहार हाताळण्यासाठी गुंतवणूक बँकर्सचे एकूण शुल्क उत्पन्न ह्युंदाईच्या पेमेंटनंतर इन्व्हेस्टमेंट बँकर्सनी एका वर्षात कमावलेली ही सर्वाधिक फी आहे.