आताच रेपो दरात कपात करणे धोकादायक; आरबीआय गव्हर्नर दास यांचा इशारा

    19-Oct-2024
Total Views |
big-risk-reducing-interest-rates-now


मुंबई :     
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय)ने रेपो रेट स्थिर ठेवत मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठे भाष्य केले आहे. ते म्हणाले, आता जर रेपो दरात कपात केली तर ते घाईचे ठरेल, असा इशारा गव्हर्नर दास यांनी दिला. तसेच, हे पाऊल अर्थव्यवस्थेसाठी खूप धोकादायक ठरू शकते. किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये सुमारे ५.५ टक्क्यांपर्यंत वाढली असून ऑक्टोबरमध्येही हा आकडा असाच राहण्याची अपेक्षा आहे.




जेव्हा तुमची चलनवाढ ५.५ टक्के असेल आणि पुढच्या महिन्याचे आकडे जास्त असतील, तेव्हा दर कपात हा अकाली आणि अतिशय धोकादायक निर्णय असू शकतो. जर विकास दर चांगला असेल तर आम्ही दर कमी करू शकत नाही असे सूचित केले. महागाई ४ टक्क्यांच्या लक्ष्याजवळ राहील तेव्हाच दर कमी करण्याचा विचार आरबीआय करेल, असे गव्हर्नर दास ब्लूमबर्गच्या इंडिया क्रेडिट फोरममध्ये म्हणाले.

विशेष म्हणजे आरबीआयने सध्याच्या दर कपातीबाबत कोणतेही अंदाज व्यक्त केलेला नसून पुढील डेटा उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागेल. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये किरकोळ चलनवाढ ४ टक्क्यांच्या आसपास राहू शकते, असा अंदाज डेप्युटी गव्हर्नर मायकेल देवव्रत यांनी व्यक्त केला आहे. येत्या वर्षभरात महागाईचा कल काय असेल हे पाहावे लागेल आणि त्यानुसार पावले उचलण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत सलग दहाव्यांदा रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.